
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स.) महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 6, 7 ,8 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जनसंवाद यात्रा उत्साहात पार पडली.
मतदारांशी थेट संवाद साधत लोकशाही, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
जनतेने कोणत्याही जात-धर्माच्या पलीकडे जाऊन संविधानात्मक विचारधारेसाठी मतदान करावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis