
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
फेब्रुवारीअखेर राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्या ग्रामपंचायतींना पुढील निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ द्यावी, अथवा विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती करावे, अशी मागणी सरपंच परिषदेने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली.
राज्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 कालावधीत निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या मुदत फेब्रुवारीअखेर संपत आहेत. वास्तविक राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, प्रभाग आरक्षण, मतदार याद्या व निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. मात्र, राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यावर प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे प्रशासक ऐवजी ग्रामपंचायतींना मुदतवाढ द्यावे, अशी मागणी सरपंचांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड