साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करण्याची मागणी
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)। चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेच्या दरात तब्बल तीनशे रुपयांची घट झाल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलचा विक्री दर वाढवावा, अशी मागणी राष्ट्रीय
sugar


पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)। चालू गळीत हंगामाच्या प्रारंभी साखरेच्या दरात तब्बल तीनशे रुपयांची घट झाल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीत सापडला असून, साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ४१ रुपये करावा, तसेच इथेनॉलचा विक्री दर वाढवावा, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे शिष्टमंडळ लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच देशभरात साखरेचे दर ३ हजार ८५० रुपयांवरून ३ हजार ५५० रुपये प्रति क्विंटल इतके घसरले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत इथेनॉलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसताना साखरेच्या दरातील ही घसरण साखर कारखानदारीसाठी गंभीर ठरत आहे. सध्या देशभरात ऊस गळीत हंगाम वेगात सुरू असला, तरी साखर व इथेनॉल या दोन प्रमुख उत्पन्न स्रोतांमधून मिळणाऱ्या अपुऱ्या महसुलामुळे साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना १४ दिवसांत ऊस बिले अदा करणे कठीण होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande