छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)।
महापालिका निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या कालावधीत आपल्याचा आपल्या भागातच राहायचे आहे. यामुळे निवडणूका शांततेत व्हाव्यात यासाठी प्रत्येकांनीच प्रयत्न करावेत. असे आवाहन आम्ही करतोय. पोलिसांकडून शांतता राखण्याबाबत वारंवार आवाहन करूनही काही जण कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा समाजकंटकांविरोधात पोलिस कडक कारवाई करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
पोलिस आयुक्त प्रविण पवार म्हणाले, 'महापालिका निवडणुकीच्या दरम्यान शहराची कायदा आणि सुव्यवस्था किंवा शांतता बाधीत होणार नाही. यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत विविध प्रभागांमध्ये निवडणुकीत उमेदवारांची बैठक ही आयोजिण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या निमंत्रणावर उमेदवार
आपल्या प्रचारातील वेळेत आयुक्तालयाच्या बैठकीत येत आहेत. आम्ही त्यांना निवडणूक आचारसंहितेचे पालन करून कोणताही वाद होऊ नये. याची काळजी घेण्याचे आवाहन करीत आहोत.'
यानंतरही गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात प्रचार फेरीला विरोध, काळे झेंडे दाखविणे; तसेच अन्य पक्षांच्या उमेदवाराच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी अशा प्रकरणात सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणुकीत प्रचारादरम्यान शांतता भंग करणाऱ्यांचा पोलिसांनी चांगलाच पाहुणचार केला आहे. या पाहुणचारानंतर पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचविली जाणार नाही. अशी आमची खात्री आहे. यानंतरही निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात कायदा आणि सुव्यवस्थेसह शांतता बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर पोलिस विभागाकडून भररस्त्यावर खास पाहुणचार करण्याची कोणतीही संधी पोलिस सोडणार नाही, असा थेट इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला.
सोशल मिडीयावर निवडणूकीच्या दरम्यान एकमेकांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी सायबर विभागात विशेष टीम नेमण्यासोशलत आली आहे. आतापर्यंत एकूण २२९ पोस्ट डीलीट आणि ब्लॉक करण्यात आल्या आहेत. याशिवाय ही पोस्ट करणाऱ्यांच्या फेसबुक वॉलवर पोलिसांची नोटीस पाठविण्यात आली आहे. अशा पोस्ट काढण्याबाबत सोशल मीडियाच्या कंपनीलाही पत्र पाठवून कारवाई करण्यात येत आहे. अशा पोस्ट करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचीही प्रक्रिया केली जात असल्याची माहिती पवार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis