
लातूर, 11 जानेवारी (हिं.स.)। जसा मी विकास उदगीर मध्ये केला तसाच विकास लातूरमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न असून लातूरमध्ये लिंगायत भवन, शादी खान बुद्धविहार अशा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून लातूरला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असल्याचे माजी मंत्री संजय बनसोडे म्हणाले.
नागरी सुविधा देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक १७ मधील सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी लातूर येथे केले. ते लातूर शहरातील प्रभाग क्रमांक १७येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बालाजी भिसे, महादेवी बिराजदार, वैजंता देशमुख यांच्या प्रचारार्थ जुना औसा रोड येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की, विरोधकाच्या भूलथापांना बळी न पडता आपण सर्वांनी लातूर शहरातील अठराही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक बालाजी भिसे यांनी केले तर सूत्रसंचालन दयानंद पाटील यांनी केले. या जाहीर सभेसाठी प्रभाग क्रमांक १७मधील मोठ्या प्रमाणात मतदारांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis