पाकिस्तान लष्कर मला नियमितपणे औपचारिक निमंत्रणे पाठवते, पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराची कबुली
इस्लामाबाद , 11 जानेवारी (हिं.स.)।पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) यांच्यातील दीर्घकाळापासून करण्यात येत असलेल्या संबंधांच्या आरोपांना पुन्हा एकदा ठोस पुरावा मिळाला आहे. लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित स
पाकिस्तान लष्कर मला नियमितपणे औपचारिक निमंत्रणे पाठवते, पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराची कबुली


इस्लामाबाद , 11 जानेवारी (हिं.स.)।पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) यांच्यातील दीर्घकाळापासून करण्यात येत असलेल्या संबंधांच्या आरोपांना पुन्हा एकदा ठोस पुरावा मिळाला आहे. लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार सैफुल्लाह कसूरी याने खुलेपणाने पाकिस्तान लष्कराशी आपले निकट संबंध असल्याची कबुली दिली आहे. समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये कसूरी दावा करताना दिसतो की पाकिस्तान लष्कर त्याला नियमितपणे आपल्या कार्यक्रमांना आमंत्रित करते आणि अगदी सैनिकांच्या अंत्यसंस्काराच्या नमाजचे नेतृत्व करण्यासाठीही बोलावते.

हे विधान कसूरीने पाकिस्तानमधील एका शाळेत आयोजित कार्यक्रमात मुलांना संबोधित करताना केले. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की पाकिस्तान लष्कर त्याला औपचारिक निमंत्रणे पाठवते. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचांवर दहशतवादाविरोधात कारवाई करत असल्याचे पाकिस्तान सरकारचे दावे उघडे पडले आहेत.

सैफुल्लाह कसूरीने भारताविरोधातही भडकावू विधाने केली. भारत त्याच्यापासून घाबरलेला असल्याचा त्याचा दावा आहे. यापूर्वीही तो भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी वादग्रस्त वक्तव्ये करत आला आहे. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना नुकसान झाले, याची कबुली देतानाच भारताने चूक केली असल्याचा दावा त्याने केला.

तसेच, काश्मीरविषयी लष्कर-ए-तैयबाचा अजेंडा कधीही मागे घेतला जाणार नाही, असेही त्याने पुन्हा स्पष्ट केले. एका अन्य रॅलीदरम्यान कसूरीने स्वतःला पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार म्हटले जाण्याबाबत अभिमान व्यक्त केला होता. या आरोपांमुळे आपले नाव जगभर प्रसिद्ध झाल्याचे त्याने सांगितले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande