
पुणे, 11 जानेवारी (हिं.स.)।पुणे शहर जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागात होणाऱ्या आंतर राष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी सुमारे तीनशे किलोमीटरचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नियमानुसार गुणवत्ता पूर्ण असलेले रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केले आहेत. त्यामुळे ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहर, जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच जिल्हाधिकारी प्रशासनाच्या वतीने काही खासगी प्रायोजक यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील 25 देशांतील नावाजलेले सायकल स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील भोर, वेल्हा. मुळशी, पुरंदर, मावळ, हवेली या तालुक्यातील काही भागातील रस्ते स्पर्धेसाठी तयार केले आहेत.
या सहा तालुक्यांतील सुमारे 300 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी पीएमआरडीए (194 कोटी), जिल्हा नियोजन समिती (77 कोटी) आणि शासन (23 कोटी) या विभागांनी सुमारे 294 कोटी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामधून 100 कि.मी.चे रूंदीकरण, उर्वरित 200 किलोमीटरचे मजबुतीकरण, डांबरीकरण, आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या नियमानुसार केले आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत होणाऱ्या स्पर्धेच्या रस्त्यासाठी या दोन्ही प्रशासनाने निधी खर्च केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु