पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचारी उच्च रक्तदाबाच्या त्रासाने त्रस्त
सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यापैकी सुमारे ३५ टक्के कर्मचारी उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. कायम कर्मचारी कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या व बै
Univerisity Solapur


सोलापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यापैकी सुमारे ३५ टक्के कर्मचारी उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कायम कर्मचारी कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या व बैठ्या जीवनशैलीमुळे, तर कंत्राटी कर्मचारी भविष्याची चिंता आणि सामाजिक सुरक्षिततेच्या अभावामुळे उच्च रक्तदाबाला बळी पडत असल्याचे आढळून आले आहे.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आधारित असे संशोधन प्रथमच करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. डॉ. जगताप यांनी त्यांच्या पीएच. डी. संशोधनासाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांमधील उच्च रक्तदाना आजार आणि त्यास कारणीभूत ठरणारे घटक यांचा सखोल अभ्यास केला आहे.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानकर यांच्या प्रोत्साहनाने व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. अभय कुद‌ळे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदाब संबंधी 'एमिक टूल' हे प्रथमच देशातील विद्यापीठात वापरले गेले आहे. आता महाविद्यालय स्तरावर व इतर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांवर वापरून अधिक व्यापक स्तरावर संशोधन करण्याचा मानस आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande