
रत्नागिरी, 11 जानेवारी, (हिं. स.) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली १७ वर्षे रखडला आहे. रखडलेले काम त्वरित करण्यात यावे, या मागणीसाठी जनआक्रोश समितीने संगमेश्वरात सोनवी पुलाजवळ रस्ता रोको आंदोलन केले.
महामार्गाचे रखडलेले काम त्वरित करण्याचे आश्वासन दिल्याशिवाय रस्ता रोको मागे घेणार नाही, यावर आंदोलक ठाम होते. सलग एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईंनकर आणि पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही आंदोलक ठाम होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी