धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये लढण्याची क्षमता संपली - खा. ओवेसी
अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.) | ‘जुलमी सत्ताधाऱ्यांसोबत लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरली नसल्याने त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात हशील नाही. त्यामुळेच पाना, घड्याळ, हात या चिन्हांवर शिक्का मारणे म्हणजे मत वाया घालवणे होय,’ अशी टीका एमआयए
धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये लढण्याची क्षमता संपली- खासदार ओवेसी: ॲकडेमीक हायस्कुलच्या प्रांगणात सभा, सर्वच राजकीय पक्षांवर टीका‎


अमरावती, 11 जानेवारी (हिं.स.) | ‘जुलमी सत्ताधाऱ्यांसोबत लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरली नसल्याने त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात हशील नाही. त्यामुळेच पाना, घड्याळ, हात या चिन्हांवर शिक्का मारणे म्हणजे मत वाया घालवणे होय,’ अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

वलगाव रोडवरील ॲकडेमीक हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी ओवेसी यांची जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांवर तोफ डागली. काँग्रेस गेली अनेक वर्षे सत्तेत होती. मात्र त्याच काळात अल्पसंख्यकांवर अनेकदा हल्ले झाले.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी अमरावती येथे जाहीर सभा घेत धर्मनिरपेक्ष पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. वलगाव रोडवरील ॲकडेमीक हायस्कुलच्या प्रांगणात झालेल्या या सभेत ओवेसी म्हणाले की, जुलमी सत्ताधाऱ्यांशी लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात काहीच अर्थ नाही.ओवेसी यांनी यावेळी 'कमळ', 'पाना', 'हात' आणि 'घड्याळ' या चिन्हांना मत देणे म्हणजे मतांचा अपव्यय असल्याचे म्हटले.

काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती, मात्र त्याच काळात अल्पसंख्याकांवर अनेक हल्ले झाले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी कायदे केले गेले. 'युएपीए'सारखा कायदा काँग्रेस नेते पी. चिदंबरम गृहमंत्री असतानाच करण्यात आला, त्यामुळे 'पंजा' कधीच आपला नव्हता, असे ते म्हणाले. 'घड्याळ' सध्या मोदींच्या समर्थनार्थ उभे आहे, तर युवा स्वाभिमान पक्षाचा 'पाना' देखील त्यांचाच जोडीदार असल्याने त्यालाही मत देणे योग्य नाही, असे ओवेसींनी स्पष्ट केले.

खासदार ओवेसींच्या मते, अल्पसंख्याकांना योग्य नेता न मिळाल्याने आतापर्यंत त्यांचा सर्वांनी वापर केला. त्यामुळे त्यांना सजग करण्याचे काम मी करत आहे. यासाठी अनेक जण माझा द्वेष करतात, पण मला त्याची पर्वा नाही. मी कोणालाही घाबरत नाही. आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक मंचावर मी माझी बाजू भक्कमपणे मांडली आहे. 'डरेगे तो मरेंगे' असे म्हणत त्यांनी उपस्थितांना धीट होण्याचा सल्ला दिला. या जगात फक्त अल्लाहला घाबरले पाहिजे, इतर कोणालाही नाही, असेही ते म्हणाले.

आपल्या ३४ मिनिटांच्या भाषणात ओवेसींनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. शेतकरी, दलित, बेरोजगार आणि अल्पसंख्याकांवरील दुष्टचक्र कायम असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावतीसह राज्यात शाळांची स्थिती वाईट आहे, दवाखाने योग्य स्थितीत नाहीत आणि पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. हे सर्व बदलायचे असेल तर जनतेसाठी लढणारा पक्ष सत्तेत आला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

ओवेसींनी केंद्र सरकारच्या चीन धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या केंद्र सरकार चीनला पायघड्या घालत आहे आणि 'आमच्या देशात या आणि गुंतवणूक करा' असे म्हणत आहे. मात्र हाच चीन भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानला मदत करतो आहे. चीनने भारताची सुमारे १५ हजार चौरस किलोमीटर जमीन हस्तगत केली असून त्यावर सैनिकी चौक्या बसविल्या आहेत. भारताच्या नाकावर टिच्चून भारतावरच हल्ले करणाऱ्या चीनला देशात गुंतवणुकीसाठी आमंत्रण देणे हा देशभक्त म्हणवणाऱ्या भाजप-संघाचा देशद्रोह नव्हे का, असा सवालही ओवेसींनी विचारला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande