
रत्नागिरी, 11 जानेवारी, (हिं. स.) : येथील देवर्षीनगरात सर्व ज्ञातीबांधव व बंधू भगिनी एकत्र येण्याचा उद्देश ठेवून दरवर्षी यागाचे आयोजन केले जाते. यावर्षी पौष कृष्ण नवमी व दशमी म्हणजेच सोमवार दि. १२ जानेवारी व मंगळवार दिनांक १३ जानेवारी या दिवशी श्रीविष्णुयाग आयोजित करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी ८ ते दुपारी १ पुण्याहवाचन, मुख्यदेवता स्थापना, पूजा, जप व हवन, दुपारी १ ते २ प्रसाद - भोजन, रात्री ७ ते ८ आरत्या , रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी मुख्यदेवता हवन, पूर्णाहूती, आरती व प्रार्थना, दुपारी १२.३० ते २.३० वाजता महाप्रसाद या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास सौ. श्रद्धा तेरेदेसाई (9011608218), वस्तुरूप देणगी द्यावयाची असल्यास ओंकार ढापरे (7218136401) तसेच अधिक माहितीसाठी प्रशांत तेरेदेसाई (8668242647) यांच्याशी संपर्क करावा. या कार्यक्रमाला सर्व ज्ञातिबांधवांनी, माहेरवाशिणींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी