
कोल्हापूर, 11 जानेवारी (हिं.स.)।
महाराष्ट्रचे माऊंट ऑफ एव्हरेस्ट समजले जाणारे कसळसुबाई शिखर सर्वात लहान वयात सर करून जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या अन्विने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पन्हाळा येथील पावनगडावर स्वच्छता मोहीम राबवून गड किल्ल्यांचे संवर्धन करा व स्वच्छता राखा असा संदेश दिलेला आहे.
नुकतेच तिने कळसुबाई शिखरावरून सह्याद्री ते हिमालय पर्वत प्लास्टिक मुक्त ठेऊयात हा संदेश आंतरराष्ट्रीय पर्वत दिनादिवशी दिवशी दिला होता.
अन्वी चे हे यंदाचे चौथे वर्ष असून दरवर्षी नववर्षाचे स्वागत ते गडस्वच्छता संवर्धन मोहिमेने करत असते. या मोहिमेमध्ये तिने पावनगडावरील तुपाची विहीर,आयताकृती विहीर,चंद्र सूर्य बुरुज, टेहळणी बुरुज, महादेव मंदिर,राजसदर, दक्षिण दरवाजा येथील स्वच्छता केली. तसेच वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन केले.
अन्वी ने वय वर्ष 2 वर्ष 11 महिने ची असताना कळसुबाई शिखर सर करत यंगेस्ट माऊंटेनर हा किताब world record कॅम्म्युनिटी कडून प्राप्त केला होता.
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ राज्यातील सर्व्वोच शिखर सर केली असून नुकतेच तिने शिवजयंती दिवशी हिमालय तील 12,500 फूट उंची चे केदारकंठ -15°c तापमान मध्ये सर करत गडकोट दुर्ग संवर्धन चा संदेश दिला होता, अन्वी च्या नावे 6 world record,7 आसिया book ऑफ record,6 इंडिया book ऑफ record ची नोंद आहे.
अन्वी ने आतापर्यंत 76 दुर्ग स्वच्छता मोहीम राबविली आहेत, तसेच प्लास्टिकमुक्त पर्यावरण या अभियांना मध्ये सहभागी असते. सहा वर्षीय अन्वी हिच्या या मोहीमसाठी तिला प्रशिक्षक व आई अनिता घाटगे याचे मार्गदर्शन लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar