ठाणे - मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न
ठाणे, 11 जानेवारी (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका व ‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्
Thane


ठाणे, 11 जानेवारी (हिं.स.)। : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिका व ‘आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात विविध माध्यमातून स्वीप अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविले जात आहेत.

ठाणे महापालिका मुख्यालयासमोर अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी स्वीप उपक्रमाच्या नोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉ. मिताली संचेती, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी तथा नोडल अधिकारी प्राची डिंगणकर, संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे , सचिव दीपेश दळवी उपस्थित होत्या. रॅलीला सुरूवात करण्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी उपस्थित सायकलप्रेमींना व नागरिकांना 15 जानेवारी 2025 रोजी होत असलेल्या मतदानाबाबत शपथ दिली. सर्व सायकलप्रेमींनी शपथ घेत मतदान करण्याचा निर्धार केला.

या सायकल रॅलीत 100 हून अधिक सायकल प्रेमींनी सहभागी झाले होते. ‘माझे ठाणे माझी लोकशाही टिकवीन मी लावून बोटाला शाई’, ‘लोकशाही बळकट करूया, सुशासन आणूया’ असे संदेश देणारे फलक सायकलप्रेमींनी सायकलला लावून जनजागृती केली.

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून सुरू झालेली ही सायकल रॅली. नितीन जंक्शन सर्व्हिस रोड - तीन हात नाका - हरिणीवास सर्कल - नौपाडा पोलीस स्टेशन - शाहू मार्केट - गोखले रोड - राम मारुती रोड -अल्मेडा सिग्नल या मार्गे येऊन पुन्हा ठाणे महानगरपालिका मुख्यालयाजवळ संपन्न झाली. रॅली समाप्त झाल्यानंतर उपायुक्त डॉ.मिताली संचेती यांनी नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व सायकल प्रेमींना मतदानाविषयी जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले 15 जानेवारीला मतदान आहे त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करा मतदान बरोबर आपला अधिकार असून कर्तव्य देखील आहे. मतदानाविषयी आपण जनजागृती करत असलो तरी प्रत्यक्ष कृती देखील करा असे आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले. जे वयाने लहान सायकल प्रेमी आहेत त्यांनी देखील आपल्या आई-बाबांना, नातेवाईकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा असेही त्यांनी नमूद केले. विकासाला द्यायचं योगदान तर करा मतदान, तुमचे मत, तुमची ताकद, आई बाबा, माझ्या भविष्यासाठी मतदान करा, प्रलोभनाला नाही पडणार बळी, लोकशाहीला देऊ बळकटी असे विविध संदेश सायकल रॅली दरम्यान ठाण्यात फिरवण्यात आले.या सायकलरॅलीचे नेतृत्व गणेश कोळी, दिलीप तळेकर, अमोल कुळकर्णी, सुनील रोकडे, ज्ञानदेव जाधव, निखिल शिवलकर, चंद्रशेखर जगताप, विठ्ठल कांबळे यांनी तर कार्यक्रमाचे निवेदन प्रज्ञा म्हात्रे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande