
ठाणे, 11 जानेवारी, (हिं.स.)। – निवडणूककामी कार्यरत असलेल्या व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर काम करणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांना त्यांचा मतदानाचा अधिकार बजावता यावा यांनी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या टपाली मतदानाला अधिकारी कर्मचारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यत एकूण 1945 टपाली मतपत्रिका निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी महापालिकेच्या 9 प्रभागसमितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केली असून याच ठिकाणी टपाली मतपत्रिका देखील स्वीकारण्यात आजात आहे. आतापर्यंत मतदानाचे दिवशी कार्यरत असणाऱ्या 1292 कर्मचारी तर 653 पोलीस कर्मचारी यांच्याकडून टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. टपाली मतदानाची प्रक्रिया ही 12 जानेवारीपर्यत सुरू राहणार असून निवडणूक कामी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
टपाली मतपत्रिका स्वीकारताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असून, सुरक्षितता, नोंदणी व सीलबंद साठवणूक याबाबत विशेष दक्षता घेण्यात येत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
*प्रभाग समितीनिहाय प्राप्त झालेल्या टपाली मतदानाची आकडेवारी*
*माजिवडा–मानपाडा प्रभाग समिती – 212*
*वर्तक नगर प्रभाग समिती – 194*
*उथळसर प्रभाग समिती – 214*
*लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती – 233*
*कळवा प्रभाग समिती – 241*
*वागळे प्रभाग समिती – 174*
*नौपाडा प्रभाग समिती – 439*
*मुंब्रा प्रभाग समिती – 78*
*दिवा प्रभाग समिती – 160*
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर