बीड - श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य शोभायात्रा उत्साहात
बीड, 11 जानेवारी (हिं.स.)। श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त आज आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली. छत्रपती कॉम्प्लेक्स येथून सुरू झालेली ही शोभायात्रा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौक,
श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त आज आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा


अ


अ


बीड, 11 जानेवारी (हिं.स.)।

श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानिमित्त आज आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली. छत्रपती कॉम्प्लेक्स येथून सुरू झालेली ही शोभायात्रा लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनि चौक, कमानवेस, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन मार्गे पंचायत समिती कार्यालयासमोर पोहोचली.

प्रांगणात आल्या नंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करून गोमातेचे पूजन केले,ग्रंथ पूजन केले.तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून महंत मंदार महाराजांनी कथेला सुरुवात केली.

श्रीराम नामस्मरण, भजन-कीर्तन आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा हा मंगल प्रारंभ ठरला असून प.पू. महंत मंदार महाराज रामदासी यांच्या मधुर वाणीतील कथा निरूपण रविवार, दि. ११ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान दररोज दुपारी १२.३० ते ४.०० या वेळेत पंचायत समिती कार्यालयासमोर, आष्टी येथे होणार आहे.

सर्व भाविकांनी या पावन कथा सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande