नांदेड मनपा निवडणुकीत अफवांचा बाजार तेजीत
नांदेड, 11 जानेवारी (हिं.स. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी अफवांचा अक्षरशः पाऊस पाडला जात आहे. विकास, कामगिरी आणि जनतेचे प्रश्न बाजूला पडले असून आता थेट मतदान प्रक्रियेवरच संशय नि
नांदेड मनपा निवडणुकीत अफवांचा बाजार तेजीत


नांदेड, 11 जानेवारी (हिं.स. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी अफवांचा अक्षरशः पाऊस पाडला जात आहे. विकास, कामगिरी आणि जनतेचे प्रश्न बाजूला पडले असून आता थेट मतदान प्रक्रियेवरच संशय निर्माण करण्याचा घाणेरडा राजकीय डाव काही पक्ष व उमेदवारांकडून खेळला जात आहे. प्रचारादरम्यान काही उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते उघडपणे सांगत आहेत की, तुम्ही आमच्या पॅनलमधील चारही उमेदवारांना मत दिले तरच ईव्हीएमवर बीप वाजेल. एखाद्या उमेदवाराला वेगळ्या पक्षाचे मत दिले, किंवा क्रॉस व्होटिंग केले तर तुमचे मत रद्द होईल. इतकेच नव्हे तर ईव्हीएम मशीन क्रॉस वोटिंग स्वीकारत नाही, एकाच पक्षाला मतदान करावे लागते असा सरळसरळ खोटा आणि दिशाभूल करणारा अपप्रचार - केला जात आहे. तीन मतदान पक्षांना केले व एक मतदान अपक्षांना केले तर बाद होते असे गैरसमज पसरवले जात आहेत.

ईव्हीएम मशीनवर प्रत्येक मतदार स्वतंत्रपणे, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करू शकतो. क्रॉस वोटिंग पूर्णपणे वैध आहे. चारपैकी एक, दोन, तीन किंवा चारही उमेदवार वेगवेगळ्या पक्षांचे निवडले तरी प्रत्येक मत ग्राह्य धरले जाते. बीप आवाज येणे किंवा न येणे हे मत रद्द होण्याशी संबंधित नसून, मशीनने मत नोंदवल्याचा तांत्रिक संकेत असतो. हा प्रकार म्हणजे मतदारांच्या लोकशाही अधिकारांवर थेट हल्ला आहे. सुशिक्षित, जागरूक मतदार असलेल्या नांदेड शहरात अशा थापांद्वारे भीती निर्माण करून मतदान आपल्या सोयीने वळवण्याचा प्रयत्न होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande