इराणला स्वातंत्र्य देण्यास अमेरिका तयार- ट्रम्प
वॉशिंग्टन, 11 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (११ जानेवारी) म्हटले की, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सरकारपासून इराणला मुक्त करण्
इराणला स्वातंत्र्य देण्यास अमेरिका तयार- ट्रम्प


वॉशिंग्टन, 11 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (११ जानेवारी) म्हटले की, सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सरकारपासून इराणला मुक्त करण्यात मदत करण्यास अमेरिका तयार आहे. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी सांगितले की इराण कदाचित स्वातंत्र्याच्या दिशेने पाहत आहे आणि त्याला अमेरिकेची मदत उपलब्ध आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासन इराणवर संभाव्य हल्ल्यासाठी प्राथमिक योजना तयार करत आहे. न्यूयॉर्कच्या वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगितले कि, अमेरिकी अधिकारी इराणविरोधात ट्रम्प यांनी अलीकडे दिलेल्या इशाऱ्यानंतर पुढील पावले कोणती उचलावीत, यावर चर्चा करत आहेत. अहवालानुसार, एक पर्याय म्हणून इराणमधील अनेक लष्करी ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ना अमेरिकन लष्कराची तैनाती करण्यात आलेली आहे, ना कोणतेही लष्करी उपकरण पाठवण्यात आले आहे.

याआधी शुक्रवारी ट्रम्प यांनी इराणला आंदोलकांच्या हत्या थांबवण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी इराणी अधिकाऱ्यांना गोळीबार न करण्याचा इशारा देत म्हटले की, तसे केल्यास अमेरिका प्रत्युत्तर देईल. देशव्यापी आंदोलनांवर इराण सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याबाबत वॉशिंग्टनमध्ये वाढत चाललेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही टिप्पणी करण्यात आली आहे.

यावर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या हातांवर इराणी नागरिकांच्या रक्ताचे डाग असल्याचा आरोप केला आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या देशातील समस्यांकडे लक्ष द्यावे, असे म्हटले.दरम्यान, इराणमधील अधिकाऱ्यांनी देशभर सुरू असलेल्या आंदोलनांवर कारवाई तीव्र केली आहे. आंदोलकांना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला “ईश्वराचा शत्रू” मानले जाईल, आणि अशा गुन्ह्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

अमेरिकेने यापूर्वीही इराणवर हल्ले केले आहेत. जून महिन्यात अमेरिकन लष्कराने फोर्डो अणुसंवर्धन प्रकल्पासह तीन ठिकाणांवर किमान सहा बंकर-भेदी बॉम्ब टाकले होते. हा प्रकल्प एका डोंगराखाली सुमारे ३०० फूट खोल जमिनीखाली स्थित आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande