
बीड, 11 जानेवारी, (हिं.स.)।
उमरी (ता. केज) येथे सुलतान मॉ बीबी साहब यांच्या उरूसनिमित्त कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. तर शेवटची कुस्ती जिंकून पैलवान विजय वनवे यांनी चांदीची गदा व सात हजार ५५१ रुपये बक्षीस पटकावले.
उमरी येथे दरवर्षी सुलतान मॉ बीबी साहब उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी उरूस सुरू झाला . उरूसनिमित्त गावातील हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते काही कुस्त्यालावण्यात आल्या. तर ५ रुपयांपासून ७ हजार ५५१ रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. यामध्ये लहान थोर पैलवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर शेवटची कुस्ती विजय वनवे या पैलवानाने जिंकली. त्यांना कै. नागुराव संतराम मुळे यांच्या स्मरणार्थ सरपंच अमोल मुळे यांच्या हस्ते चांदीची गदा व ७ हजार ५५१ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. यावेळी बालासाहेब यादव, सुशेन मुळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
उमरी, ता. केज येथे ऊर्स निमित्ताने कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. विविध ठिकाणांहून आलेल्या मल्लांनी आपली ताकद व कौशल्य दाखवत उपस्थितांची मने जिंकली.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis