
जळगाव, 12 जानेवारी (हिं.स.)आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोन्यासह चांदी दरात उसळी पाहायला मिळाली असताना आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच चांदी तब्बल ९ हजार रूपयांनी महागली. दुसरीकडे आज सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून जगातील तणावग्रस्त स्थिती आणि व्यापारातील अश्चिततेमुळे सोनं आणि चांदीचे दर वाढत असल्याचा अंदाज एक्सपर्टकडून वर्तवण्यात आलाय.सध्या वाढत्या दरांमुळे ग्राहक आणि नागरिक हैराण आहेत. दरम्यान, वर्षभरात चांदीची किंमत एक लाखांपेक्षा जास्त वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आज १२ जानेवारी सकाळी सोन्याची किंमत १६०० रुपयांनी वाढून १,३९,३३४ रुपये प्रति तोळा झाली. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका बसलाय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ झाल्याने चिंता निर्माण झाली आहे. सोन्याच्या किंमतीप्रमाणेच चांदीच्या दरातही आज वाढ नोंदवण्यात आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर चांदीचे दर ३.७१ टक्क्यांनी वाढले आहेत. सकाळी चांदीच्या किमती ९,०३८ रुपयांनी वाढून २,५२,३६२ रुपये प्रति किलोवर पोहोचली. दरम्यान, एक्सपर्टच्या मते, ही दरवाढ फक्त सुरूवात आहे, भविष्यात चांदीच्या दरात आणखी वाढ होऊ शकते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर