पिंपरीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला
पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. शिवीगाळ करत ‘तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस का केले, तुम्हाला जी
पिंपरीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला


पुणे, 12 जानेवारी (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ पिंपरीगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरावर आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. शिवीगाळ करत ‘तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस का केले, तुम्हाला जीवे मारुन टाकू’ अशी धमकी देऊन विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भाजप उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले असून पिंपरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ३३ वर्षीय डॉक्टर महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सोमवारी रात्री आरोपी घरासमोर आले. आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस का केले. तुम्हाला जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली. शिवीगाळ केली. आमच्या परवानगी शिवाय घरात प्रवेश केला. चुलत सासरे यांना अश्लील शिवीगाळ केली. सासूला ढकलून दिले. त्यात त्या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande