भारतात क्रिप्टो गुंतवणुकीवर सरकारचे कडक नियंत्रण
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.)। भारतामध्ये बिटकॉइन, एथेरियमसह सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अडचणी वाढल्या आहेत. सरकार आणि वित्तीय गुप्तचर युनिट (FIU-IND) यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी क्रि
Crypto Investments


मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.)। भारतामध्ये बिटकॉइन, एथेरियमसह सर्व प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अडचणी वाढल्या आहेत. सरकार आणि वित्तीय गुप्तचर युनिट (FIU-IND) यांनी मनी लॉन्ड्रिंग आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी क्रिप्टो ट्रेडिंगवर कठोर नियंत्रण आणत पाच मोठे नियम लागू केले आहेत. या नियमांमुळे क्रिप्टो एक्सचेंजवर ट्रेडिंग करणे पूर्वीइतके सोपे राहणार नाही आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास अकाउंट गोठवले जाण्याची शक्यता आहे.

FIU-IND ने देशातील सर्व क्रिप्टो एक्सचेंज तसेच भारतात नोंदणीकृत विदेशी प्लॅटफॉर्मना कडक अनुपालनाचे आदेश दिले आहेत. वझीरएक्स, कॉइनडीसीएक्स, कॉइनस्विच यांसारख्या प्लॅटफॉर्मना आता प्रत्येक यूजरची ओळख, व्यवहार आणि निधीचा संपूर्ण तपशील सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारचे मत आहे की क्रिप्टोचा गैरवापर राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो, त्यामुळे देखरेख वाढवणे आवश्यक आहे.

नवीन नियमांनुसार यूजर जेव्हा क्रिप्टो अ‍ॅपमध्ये लॉगिन करेल तेव्हा त्याची लाईव्ह लोकेशन ट्रॅक केली जाईल. लोकेशन न दिल्यास किंवा आयपी अ‍ॅड्रेस भारताबाहेर आढळल्यास खाते तात्पुरते किंवा कायमचे फ्रीज केले जाऊ शकते. त्याचबरोबर केवळ आधार-पॅन अपलोड करणे पुरेसे नसून लाईव्ह सेल्फी, व्हिडिओ व्हेरिफिकेशनसारख्या कडक केवायसी अटी लागू करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे फर्जी आणि बेनामी अकाउंट्सवर आळा बसेल.

याशिवाय क्रिप्टो वापरताना व्हीपीएनचा वापर तात्काळ ब्लॉक केला जाणार असून एक्सचेंजना त्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या ट्रेडिंगवर निधीचा स्रोत सांगणे बंधनकारक असेल आणि इतर वॉलेटमध्ये ट्रान्स्फर करताना रिसीव्हरची संपूर्ण माहिती देणे आवश्यक ठरेल.

या कठोर नियमांमुळे भारतातील क्रिप्टो ट्रेडिंग आता पूर्णपणे सरकारी देखरेखीखाली आले असून गुंतवणूकदारांना अधिक सावधगिरीने व्यवहार करावा लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande