इराणमधील आंदोलनांवर ट्रम्प आक्रमक, बैठकीआधी दिला कारवाईचा इशारा
वॉशिंग्टन , 12 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सत्तेवर तीव्र हल्ला चढवला. देशभर सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमुळे अडचण
ईरानमधील आंदोलनांवर ट्रम्प आक्रमक, बैठकीआधी दिला कारवाईचा इशारा


वॉशिंग्टन , 12 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सत्तेवर तीव्र हल्ला चढवला. देशभर सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनांमुळे अडचणीत सापडलेल्या इराणी नेतृत्वाने माझ्याशी चर्चेसाठी संपर्क साधला आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला. यासंदर्भात एका बैठकीची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी स्पष्ट इशारा दिला की बैठक होण्याआधीच आम्हाला कारवाई करावी लागू शकते.

इराण किंवा त्याच्या सहयोगींनी संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्यास काय होईल, या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “जर त्यांनी तसे केले, तर आम्ही त्यांना अशा पातळीवर शिक्षा करू, जी त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवलेली नसेल.”डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, इराणचे सर्वोच्च नेते सैयद अली हुसेनी खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांनी, इस्लामिक प्रजासत्ताकात सुरू असलेल्या व्यापक सरकारविरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिकेच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या धमक्यांनंतर, चर्चेसाठी त्यांना फोन केला होता.

ट्रम्प म्हणाले, “जर असे दिसले की ते या दिशेने जात आहेत आणि काही असे लोक मारले गेले आहेत ज्यांना मारले जाणे अजिबात योग्य नव्हते. जर तुम्ही त्यांना नेते म्हणत असाल, तर ते हिंसक आहेत. मला माहित नाही की ते खरेच नेते आहेत की केवळ हिंसेच्या जोरावर राज्य करतात. पण जर त्यांनी तसेच सुरू ठेवले, तर आम्हाला बैठकीआधीच कारवाई करावी लागू शकते.”

इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांबाबत ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांना इराणमधील परिस्थितीची क्षणोक्षणी माहिती मिळत आहे आणि यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. याचबरोबर, इराण किंवा त्याच्या सहयोगींनी प्रत्युत्तरात्मक पावले उचलल्यास, अमेरिकेची भूमिका काय असेल, याबाबतही त्यांनी ठाम इशारा दिला. “जर त्यांनी तसे केले, तर आम्ही त्यांना इतका कठोर प्रत्युत्तर देऊ, की त्यांनी कधीच कल्पनाही केली नसेल. त्यांना यावर विश्वासही बसणार नाही,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande