नाशिकमध्ये दोन लाचखोर पोलीस उपनिरीक्षक निलंबित
नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.)। - गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी २ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी २ पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. लक्ष्मीनगर, कामटवाडे रोड, नाशिक), पोलीस उपनिरीक्षक अतुल
नाशिकमध्ये  दोन लाचखोर पोलीस उपनिरीक्षक निलंबित


नाशिक, 13 जानेवारी (हिं.स.)। - गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी २ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी २ पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. लक्ष्मीनगर, कामटवाडे रोड, नाशिक), पोलीस उपनिरीक्षक अतुल भुजंगराव क्षीरसागर (नाशिक) अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. उ

पनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी मोबाईलवरून तक्रारदार केतन पवार व उपनिरीक्षक गोडे यांचे बोलणे करून देत लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिले. दोन उपहारगृह चालकांसह दोन पोलीस अधिकारी यांनी बेकायदेशीर मार्गाने पैशांच्या स्वरूपात लाभ मिळविण्याची व्यवस्था करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनी गैरवर्तन पोलीस दलाच्या शिस्तीचा भंग केला आहे. त्यामुळे दोघांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित काळात दोघांना मुख्यालय नियंत्रण कक्षात दिवसातून दोनवेळा हजेरी द्यावी लागणार आहे. उपायुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, पोलीस आयुक्तांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक व उपहारगृहाच्या २ चालकांनी तक्रारदाराकडून २ लाख रूपये लाच स्विकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यातून समोर आले आहे. न्यायालयाने उपहारगृहाच्या बापलेकांना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande