
अकोला, 14 जानेवारी (हिं.स.)। मतदानाच्या एक दिवस आधी अकोला शहरात मोठी कारवाई समोर आली आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुन्या पारस्कर शोरूमजवळ खदान पोलिसांनी तब्बल ५० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड एका दुचाकीस्वाराकडून जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर रोकड निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी आणण्यात आली होती की व्यापाराशी संबंधित व्यवहारासाठी होती, याबाबत सध्या पोलीस सखोल तपास करत आहेत. मतदानाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने शहरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास खदान पोलीस करत असून, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे