बीड जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतूक करणारी २ वाहने जप्त
बीड, 14 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील महसूल खात्याच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई उमरद जांघिर फाटा येथे करण्यात आली. गोपनीय माहितीवरून पथकाने गस्त घातली. यावेळी सिरस पारगावकडून बीडकडे जाणारा विना न
बीड जिल्ह्यात अवैध वाळूची वाहतूक करणारी २ वाहने जप्त


बीड, 14 जानेवारी (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील महसूल खात्याच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई उमरद जांघिर फाटा येथे करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून पथकाने गस्त घातली. यावेळी सिरस पारगावकडून बीडकडे जाणारा विना नंबरचा हायवा आढळून आला. त्यात अंदाजे पाच ब्रास वाळू होती.वाळू ही गेवराई तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथून आणल्याचे त्याने सांगितले. हायवा ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.दुसऱ्या एका घटनेत महसूल खात्याचा अधिकाऱ्यांनी अहेर चिंचोली येथे कारवाई केली. यावेळी विना नंबरचे न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर एक ब्रास वाळू वाहतूक करताना पकडले. ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रॅक्टरचे मालक कामराज पवळ, रा. अहेर चिंचोली असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही वाहनांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दंडात्मक कारवाई होणार आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande