अमेरिकेने जूनमध्ये केलेली चूक पुन्हा करू नये- अब्बास अराघची
तेहरान , 15 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या विरोध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तणाव कायम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका निवेदनात आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. यानंतर अमेर
अमेरिकेने जूनमध्ये केलेली चूक पुन्हा करू नये- अब्बास अराघची


तेहरान , 15 जानेवारी (हिं.स.)।इराणमध्ये सुरू असलेल्या विरोध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तणाव कायम आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका निवेदनात आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. यानंतर अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, अशा तर्कवितर्कांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर इराणी सरकारने आता इशारा दिला असून, “मागील चूक पुन्हा करू नका,” असे स्पष्टपणे म्हटले आहे. जून २०२५ मध्ये इराणच्या अणु ठिकाणांवर झालेल्या अमेरिकन हल्ल्याच्या संदर्भात हा इशारा देण्यात आल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र टीका केली. अराघची यांना पत्रकाराने विचारले की, आंदोलनकर्त्यांना मदत करण्यासाठी कोणतीही कारवाई करण्याचा विचार करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी तुमच्याकडे काही संदेश आहे का? यावर अराघची म्हणाले, “माझा संदेश एवढाच आहे की जूनमध्ये तुम्ही जी चूक केली होती, ती पुन्हा करू नका. एखादा अपयशी अनुभव पुन्हा केल्यास त्याच परिणामांना सामोरे जावे लागते.”अब्बास अराघची पुढे म्हणाले, “तुम्ही जूनमध्ये आमच्या अणु केंद्रांवर हल्ला केला, यंत्रसामग्री नष्ट केली, पण तंत्रज्ञानावर बॉम्बफेक करता येत नाही आणि दृढ संकल्पांवरही बॉम्ब टाकता येत नाही.”

परराष्ट्र मंत्री अराघची यांनी स्पष्ट केले की इराण नेहमीच चर्चा आणि कूटनीतीसाठी तयार राहिला आहे, मात्र अमेरिकेने त्यापासून दूर राहिल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “इराण संवाद आणि कूटनीतीसाठी सज्ज आहे. गेल्या २० वर्षांत आम्ही हे सिद्ध केले आहे. मात्र अमेरिकाच अशी आहे जी नेहमी कूटनीतीपासून दूर राहिली, जिने कूटनीती संपवून युद्धाचा मार्ग निवडला. युद्ध आणि कूटनीती यांपैकी कूटनीती हा अधिक चांगला मार्ग आहे, हा माझा संदेश आहे. आम्हाला अमेरिकेकडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, तरीही युद्धापेक्षा कूटनीतीच अधिक श्रेष्ठ आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande