कलाकारांनाही घेतला मतदानात उत्स्फुर्त सहभाग
मुंबई, 15 जानेवारी, (हिं.स.)। आज मुंबई, पुणे तसेच अनेक शहरांमध्ये महानगरपालिकेचे मतदान पार पडले. यावेळी अनेक मराठी कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसले. तसेच त्यांनी नागरिकांनाही मतदानाचे महत्व सांगून मतदान करण्याचे आवाहन केले. अभिनेता शशांक क
कलाकारांनाही घेतला मतदानात उत्स्फुर्त सहभाग


मुंबई, 15 जानेवारी, (हिं.स.)। आज मुंबई, पुणे तसेच अनेक शहरांमध्ये महानगरपालिकेचे मतदान पार पडले. यावेळी अनेक मराठी कलाकार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसले. तसेच त्यांनी नागरिकांनाही मतदानाचे महत्व सांगून मतदान करण्याचे आवाहन केले.

अभिनेता शशांक केतकर, मोहन आगाशे, नाना पाटेकर, हेमंत ढोमे, किशोरी शाह, प्रिया बेर्डे, सुबोध भावे, प्राजक्ता माळी, नम्रता गायकवाड यांच्यासह अनेक कलाकारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूडचे कलाकारही मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. अक्षय कुमार, सलमान खान, मिलिंद गुनाजी, रजत कपूर, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, महिमा चौधरी, सुनील शेट्टी, रणबीर कपूर, जुनैद खान, भाग्यश्री, जॉनी लिवर, पद्मिनी कोल्हापुरे हेमा मालिनी, राकेश रोशन, जॉन इब्राहिम, परेश रावल, आमिर खान, किरण राव, श्रद्धा कपूर, कैलाश खैर, मनीश मल्होत्रा, मनीष पॉल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, वरुण धवन, ट्विंकल खन्ना, करिश्मा कपूर, तमन्ना भाटिया, सोनाली बेंद्रे व इशा कोपीकर हे आज मतदानात सहभागी झाले.

अभिनेता अक्षय कुमार याने मतदान करतेवेळी नागरिकांना खास आवाहन केले. तो म्हणाला, घराबाहेर पडा आणि मतदान करा. घरांना पाणीपुरवठा नाही, वीज नाही, खराब रस्ते आहेत, कचरा व्यवस्थापनाची कमतरता आहे, अशा तक्रारी आपण नेहमी करत असतो. या सर्व तक्रारींवरील उपाय म्हणजे योग्य उमेदवार निवडून देणे, ज्यामुळे आपल्या समस्या सोडवल्या जाऊ शकतील. आज बीएमसी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबईतील रहिवासी असल्याच्या नात्याने आज संपूर्ण कंट्रोल आपल्या हातात आहे. मी मुंबईतील सर्व नागरिकांना विनंती करत आहे की घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा. जर आपल्याला मुंबईचे खरे हिरो व्हायचे असेल तर आपण संवादांमध्ये रमून जाऊ नये तर बाहेर येऊन मतदान केले पाहिजे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande