
छत्रपती संभाजीनगर, 15 जानेवारी (हिं.स.)। वैजापूर शहरात रात्रीबेरात्री तसेच दिवसाही बुलेट गाडीला कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून वेगाने गाड्या पळवणाऱ्या आठ दुचाकीचालकांच्या विरुद्ध पोलिसांनी मोटार अधिनियमानुसार दंडात्मक कार्यवाही केली. या वाहनचालकांना आठ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. वाहन पोलिस निरीक्षक यांनी याबाबत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन समाजातील वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच लहान मुलांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या मोठ्या आवाजाच्या बुलेट गाड्यांना पकडण्यासाठी शहरातील विविध भागांत पथके तैनात केली. त्यानंतर अशी आठ वाहने पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक नितीन नलवडे, नागरगोजे, पोलिस अंमलदार अविनाश भास्कर, रावसाहेब रावते, कुलदीप नरवडे, प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अभिजित डहाळे, अमोल कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गाड्यांच्या सायलेन्सरचा आवाज सार्वजनिक शांततेस बाधा येईल असा प्रचंड कर्णकर्कशपणे येत असल्याने ही वाहने पोलिस ठाण्यात आणून ठेवण्यात आले. त्यांचे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर पुढील कार्यवाहीसाठी काढण्यात आले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis