खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दहा वर्षाचा कारावास!
अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)। अकोट येथील न्यायालयाने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.. पोलिस स्टेशन दहिहंडा येथे फिर्यादी विशाल विठठलराव गोटुकळे वय २० वर्ष रा वडत यांनी दिनांक १४.०६.२०१४ मध्ये तकार दिली
खुनाच्या प्रयत्न करणाऱ्या आरोपीला दहा वर्षाचा कारावास!


अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)।

अकोट येथील न्यायालयाने खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे..

पोलिस स्टेशन दहिहंडा येथे फिर्यादी विशाल विठठलराव गोटुकळे वय २० वर्ष रा वडत यांनी दिनांक १४.०६.२०१४ मध्ये तकार दिली की त्यांचे रात्री ११/०० वा चे सुमारास वहत बु गावाजवळील पुर्णा नदीच्या पत्रातुन एक ट्रक्टर फिर्यादी विशाल व त्याचा मित्र विनोद यांना दिसला ते पाहण्याकरीता नदीकडुन येणा-या रस्त्यावर हे दोघेही थांबले असता निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रक्टर आरोपी संजय भटकर हा स्वता चालवित होता. परंतु दि.१४/०६/२०१४ चे ०३ ते ०४ दिवसापुर्वि आरोपी संजय भटकर रा. वडद खु गावातील नदिच्या घटावरून ट्रक्टरव्दारे रेती नेत होता तेव्हा त्या प्रकरणातील फिर्यादी विशाल व त्याचा मित्र विनोद याने आरोपी संजय भटकर यास म्हटले की आमच्या गावातील नदी खराब का करतोस त्यावर आरोपीने तुझ्या बापाचे काय जाते. तुम्हाला बघुन घेतो असे म्हणुन निघुन गेला होता व तो राग मना मध्ये ठेवुन आरोपी संजय भटकर व इतर ०६ आरोपींच्या मदतीने घटने दिवशी फिर्यादी व त्याचा मित्र विनोद याला बघताच ट्रक्टर थांबवीला व ट्रॉलीत बसलेल्या लोकांना बघता काय धरा साल्यांना असे म्हणुन फिर्यादी व त्याचा मित्र विनोद कळसकर यास सर्वांनी लाथाबुक्यांनी व फावडयांनी मारण्यास सुरूवात केली त्यांना मारू नका अशी विनंती केली असता आरोपी संजय भटकर हा स्वता हातात फावडे घेवुन फिर्यादी विशाल याच्या डोक्यावर मारले व त्याला खाली पाडले तसेच विनोद याला सुध्दा मारून जागेवरव तो बेशुध्द पडला व दोघेही जख्मी झाले होते. फिर्यादीच्या उपचारादरम्यान नोंदविलेल्या जबाबा व प्राप्त वैदयकिय अहवालावरून वरून आरोपी संजय अंबादास भटकर वय ५५ वर्ष रा. वडद खु याचे विरूध्द अप क ५०/२०१४ कलम ३०७,१४३,१४४,१४७,४९५,५०४, ५०६ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि भास्कर तायडे पो. स्टे दहिहंडा यांनी पुर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सदद्ध प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासले. साक्षीदारांचे पुरावे ग्राहय धरून जिल्हा व सत्र न्यायाधिश अकोट, जि. अकोला यांनी आज रोजी आरोपी संजय अंबादास भटकर यय ५५ वर्ष रा. वहद खु जि. अकोला यास कलम ३०७, भा.द.वि. मध्ये दोषी ठरवुन १० वर्ष सश्रम कारावास व ३०,००० रू दंड, दंड न भरल्यास ०६ महिने अधिक कारावासाची शिक्षा सुनाविली आहे.

सदर प्रकरणी शिक्षा होण्याच्या दृष्टीने पोलिस अधिक्षक, अर्चित चांडक व अपर पोलिस अधिक्षक, बी. चंद्रकांत रेडडी, निखील पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी, अकोट यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. गोपाल ढोले पो. स्टे दहिहंडा व पैरवी पोहेकों दिनेश काळे यांनी शिक्षा होण्यास सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande