विनयभंग प्रकरणी आरोपीला एक वर्ष कारावासाची शिक्षा!
अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)। अकोल्यातील पातूर येथील प्रथम वर्ग न्यायदडाधिकरी यांनी एका आरोपीला विनयभंग प्रकरणी एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 2 हजार रुपये दंड ठोठावला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशन पातुर हददीतील ग्राम माझोड येथे दि
कोर्ट लोगो


अकोला, 17 जानेवारी (हिं.स.)।

अकोल्यातील पातूर येथील प्रथम वर्ग न्यायदडाधिकरी यांनी एका आरोपीला विनयभंग प्रकरणी एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि 2 हजार रुपये दंड ठोठावला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशन पातुर हददीतील ग्राम माझोड येथे दिनांक २९/०७ / २०१६ रोजी फिर्यादी पिडीता यांनी घडलेल्या घटनेची तक्रार दिली कि, घटनेतील आरोपी शंकरराव विश्वासराव टाले रा. माझोड ता. पातुर जि. अकोला याने पिडीता हि शौचास जात असतांना आरोपिने पिडीताचा पाठलाग करून तिचा हात धरून, तु मला आवडतेस असे म्हणुन विनयभंग केला वरून आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन पातुर येथे अप क १४७/२०१६ कलम ३५४. अ (१) ३५४ड, भादविच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता -गुन्हयाचा तपास पो. हवा. संजय चव्हाण बं.नं. १६८१ यांनी करून दोषारोप पत्र पातूर न्यायालयात दाखल केले होते.

सदर प्रकरणी साक्ष पुराव्यावरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पातुर, जि. अकोला यांनी गुन्हयातील आरोपी शंकरराव विश्वासराव टाले रा. माझोड ता. पातुर जि. अकोला यास कलम ३५४. भादविच्या कलमान्वये दोषी ठरवुन ०१ वर्ष कारावास व २००० रू दंडाची शिक्षा सुनावली आहे.. दंड न भरल्यास ०१ महीना साधी कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्हयात सरकारी पक्षाची बाजू. पी.एस ठाकरे सरकारी अभियोक्ता यांनी मांडली असुन पातुर येथील पैरवी अंमलदार पो. हवा मो. नियाज खान यांनी कोर्ट पैरवी म्हणुन कामकाज पाहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande