प. बंगालमध्ये घुसखोरांना तृणमूल काँग्रेसचे संरक्षण - प्रेम शुक्ला
मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) - पश्चिम बंगालमध्ये घुसखोर मतदारांना वाचविण्यासाठी तृणमूल काँग्रेस ज्याप्रकारे संघटितरीत्या एसआआर प्रक्रियेत अडथळे आणत आहे, ते पाहता तृणमूल काँग्रेसची संपूर्ण मदार घुसखोर मतदारांवर असल्याचे सिद्ध होत आहे. तुष्टीकरण, माफि
प्रेम शुक्ला


मुंबई, 17 जानेवारी (हिं.स.) - पश्चिम बंगालमध्ये घुसखोर मतदारांना वाचविण्यासाठी तृणमूल काँग्रेस ज्याप्रकारे संघटितरीत्या एसआआर प्रक्रियेत अडथळे आणत आहे, ते पाहता तृणमूल काँग्रेसची संपूर्ण मदार घुसखोर मतदारांवर असल्याचे सिद्ध होत आहे. तुष्टीकरण, माफिया आणि क्राईम कल्चर हाच टीएमसीचा खरा चेहरा आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांना शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान हे यावेळी उपस्थित होते. ज्या बंगालचा इतिहास सोनार बांगला म्हणून देशासाठी आदर्श मानला जात होता, त्या बंगालचा चेहरा तृणमूल काँग्रेसने रक्तरंजित केला, असा आरोपही त्यांनी केला.

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही आणि बौद्धिक परंपरेची हत्या सुरू आहे. यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हायला हवी. राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या ममता बॅनर्जी एखाद्या खाजगी संस्थेच्या कार्यालयात बळजबरीने घुसतात, तेथील फाईल्सची चोरी करतात, हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या चोरीबद्दल नापसंती व्यक्त केली आहे. घुसखोर मतदारांना वाचविण्यासाठी एसआयआर प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष जाधवपूर विधानसभा क्षेत्रातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष बूथ अधिकारी अशोक दास यांच्यावर तृणमूलच्या वॉर्डच्या नेता अनन्या बॅनर्जी व राजू विश्वास यांनी दबाव आणून मतदार यादीतील एक नाव जरी हटविले तर जीवघेणे हल्ला करून कुटुंबातील महिलांवर बलात्कार केला जाईल, मुलाबाळांचा जीव घेतला जाईल अशा धमक्या दिल्याने या अशोक दास यांनी आत्महत्या केली. अशोक दास यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांविरोधात हिंसाचारास ममता बॅनर्जी या प्रोत्साहन देत आहेत. अशाच प्रकारे एसआयआर प्रक्रियेत दबाव, हिंसाचार नासधूस करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणून अल्पसंख्य घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असून तृणमूल काँग्रेस आपली वाट बँक तयार करत आहे, असा थेट आरोप प्रेम शुक्ला यांनी केला.

जेव्हा कोणी घुसखोरांचा देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून पकडले जाते, तेव्हा त्यांच्याकडे बंगालीच कागदपत्रे कशी आढळतात, असा सवालही त्यांनी केला. बंगालमध्ये देशद्रोही प्रवृत्तींना दहा हजार रुपयांपासून दहा लाख रुपयांच्या मोबदल्यात राष्ट्रीय ओळख मिळवून देणारी कागदपत्रे बनवून दिली जात असून या बनावट कागदपत्रांच्या आधारावर देशभर घुसखोरांचा सुळसुळाट होत आहे. ममता सरकारच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हे घुसखोर संपूर्ण देशात आपल्या कब्जा प्रस्थापित करत आहेत, असे ते म्हणाले. या राजकारणामुळेच तेथील ७२ भाग गेल्या १२ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलांकडे हस्तांतरित करण्यात अडचणी येत असून सीमेवर कुंपण घालण्याचे कामदेखील होऊ दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. याच भागांतून तृणमूल काँग्रेसच्या संरक्षणाखाली घुसखोर भारताच्या हद्दीत प्रवेश करतात, असे त्यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसच्या धमक्या आणि दबावामुळे आत्महत्या केलेल्या अशोक दास यांच्या कुटुंबास पश्चिम बंगाल सरकार न्याय देणार का, त्यांच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ममता पक्षातून हाकलणार का, असा सवाल करून ते म्हणाले की पश्चिम बंगालमध्ये निवडणूक कर्मचाऱी मृत्यूच्या सावटाखाली वावरत असून ममता सरकार पश्चिम बंगालचा बांगलादेश बनवत आहे.

पश्चिम बंगालप्रमाणे पंजाबमधील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारकडून माध्यमांची गळचेपी केली जात असून ही कृती १९७५ मधील आणीबाणीची आठवण करून देते, असे ते म्हणाले. ज्या माध्यमांच्या जोरावर आम आदमी पार्टीला चेहरा प्राप्त झाला, त्या माध्यमांचीच गळचेपी होत असल्याची माहिती देताना, पंजाब केसरी या प्रख्यात वृत्तपत्रावर मान सरकारने धाड घालून कर्मचाऱ्यांच्या मारहाण केल्याचा व कार्यालयाची नासधूस केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ल्याचा आमचा पक्ष तीव्र निषेध करतो, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande