
जळगाव, 17 जानेवारी (हिं.स.)जळगाव शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना समोर आलीय आहे. या हल्ल्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू भंगाळे यांचे वाहन निवासस्थानाबाहेर पार्किंग केली होती. रात्री अज्ञात व्यक्तींनी या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्या असून यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र या घटनेवरून विष्णू भंगाळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेमागील व्यक्तीस वेळीस ठेचून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून राजकीय वैरातून हा प्रकार घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर