श्रेयस अय्यरचे दोन वर्षांनी टी-२० संघात पुनरागमन, बिश्नोईलाही संधी
नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.)भारतीय क्रिकेट संघाने तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी समावेश करण्यात आलेल्या दोन क्रिकेटपटूंची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्यांच्या जागी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांची निवड करण्यात
श्रेयस अय्यर


नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.)भारतीय क्रिकेट संघाने तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जागी समावेश करण्यात आलेल्या दोन क्रिकेटपटूंची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्यांच्या जागी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांची निवड करण्यात आली आहे. बरगडीच्या दुखापतीमुळे सुंदर मालिकेतून बाहेर पडला आहे, तर शस्त्रक्रियेमुळे तिलक पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

श्रेयसने डिसेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याचा विचार केला नाही. निवड समितीने तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड यांसारख्या क्रिकेटपटूंना प्राधान्य दिले होते. दरम्यान, श्रेयसने स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध केले. त्याने २०२४ मध्ये केकेआरला विजेतेपद जिंकण्यास मदत केली आणि २०२५ मध्ये पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेले होते.

वॉशिंग्टन सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे याची माहिती दिली. ११ जानेवारी रोजी वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली होती. तर गोलंदाजी करताना सुंदरला त्याच्या खालच्या बरगड्यांमध्ये तीव्र वेदना जाणवत होत्या. त्यानंतर, सुंदरने स्कॅन केले आणि वैयक्तिकरित्या डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्याला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर तो बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) ला रिपोर्ट करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande