अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत गोवंश तस्करी उधळली
अकोला, 18 जानेवारी (हिं.स.)। अकोला पोलीस दलाने गोवंश तस्करीविरोधात धडक कारवाई करत ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठे यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन माना व रामदास पेठ हद्दीत स्वतंत्र
अकोल्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत गोवंश तस्करी उधळली


अकोला, 18 जानेवारी (हिं.स.)।

अकोला पोलीस दलाने गोवंश तस्करीविरोधात धडक कारवाई करत ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठे यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली 18 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन माना व रामदास पेठ हद्दीत स्वतंत्र कारवाया करण्यात येऊन 09 गोवंशांना जीवनदान देण्यात आले असून ₹7.66 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

माना पोलीस ठाणे हद्दीत कारवाई मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माना पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता, एक अनोळखी इसम त्याच्या ताब्यातील गोवंशीय बैलांना आखूड दोराने बांधून, अत्यंत अमानुष व निर्दय पद्धतीने कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 05 गोवंशीय बैल ताब्यात घेतले. जप्त गोवंशांची अंदाजे किंमत ₹1.16 लाख इतकी आहे. रामदास पेठ पोलिसांची कारवाई

रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 04 गोवंश व 01 पिकअप वाहन असा एकूण ₹6.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 9, 11 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (ए), (एफ), (एच), (आय) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवंश तस्करीविरोधात पोलिसांनि कडक पवित्रा घेतला असून दोन्ही कारवायांमुळे गोवंश तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अकोला पोलीस दल गोवंश तस्करी व प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात कठोर भूमिका घेत असून, ऑपरेशन प्रहार अंतर्गत अशा कारवाया पुढेही अधिक तीव करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande