लातूर ग्रामीणमध्ये भाजपची लाट; उमेदवारीसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी!
संवाद'' कार्यालय फुलले; आ. रमेशअप्पा कराडांच्या नेतृत्वावर विश्वास! लातूर, 18 जानेवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली
लातूर भाजप


'संवाद' कार्यालय फुलले; आ. रमेशअप्पा कराडांच्या नेतृत्वावर विश्वास!

लातूर, 18 जानेवारी (हिं.स.)।

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून, लातूर ग्रामीण मतदारसंघातील मुलाखती दरम्यान कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.

​भाजपचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या लातूर येथील 'संवाद' जनसंपर्क कार्यालयात शनिवारी इच्छुकांची मांदियाळी जमली होती. उमेदवारी कोणालाही मिळो, विजय भाजपचाच होईल, असा निर्धार प्रत्येक इच्छुकाने यावेळी व्यक्त केला.

​मुलाखतींचे महत्त्वाचे पैलू:

​प्रमुख उपस्थिती: राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाजी पटेल, आ. रमेशअप्पा कराड आणि माजी आमदार अॅड. त्र्यंबकनाना भिसे.

​मतदारसंघ: मुरुड, काटगाव, एकुर्गा, तांदूळजा, निवळी, भातांगळी, पानगाव, खरोळा, कामखेडा, पोहरेगाव, भादा, हरंगुळ, आर्वी, उजनी, आशिव आणि महाराणाप्रताप नगर या सर्व गटांतील इच्छुकांनी हजेरी लावली.

​विकासाची शिदोरी, विजयाची खात्री!

​पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आ. रमेशअप्पा कराड यांनी मतदारसंघात कोट्यवधींचा निधी आणला आहे.

रस्ते, नाली आणि पाणीपुरवठा योजनांचे जाळे.

भव्य मंदिर जीर्णोद्धार आणि समाज मंदिरे.

वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी.

​विकास निधी काय असतो आणि गावचा कायापालट कसा होतो, हे आ. रमेशअप्पांनी कृतीतून दाखवले आहे.

त्यामुळेच आज प्रत्येक गट आणि गणात भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande