अमित देशमुख यांचा काँग्रेस व वंचितच्या विजयी उमेदवारांसह विविध संघटना पदाधिकाऱ्यांशी संवाद
लातूर, 18 जानेवारी (हिं.स.)। काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेत संवाद साधला. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचा
अमित देशमुख


लातूर, 18 जानेवारी (हिं.स.)।

काँग्रेसचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवारी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेत संवाद साधला. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चाकूर व जळकोटसह ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश देखील यावेळी पार पडला.

लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला मिळालेले यश आणि यासाठी अथक परिश्रम घेतलले पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केलेले कार्य व लातुर मधील मतदार बंधू भगिनी यांच्याकडून काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आमदार अमित देशमुख यांनी आभार मानले तसेच नवनियुक्त मनपा सदस्यांना त्यांचे प्रभाग आणि लातुर शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या काळात कराव्या लागणाऱ्या कामाकरीता शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बाभळगाव निवासस्थानी जळकोट येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी शांताताई लक्ष्मणराव आडावळे व रमण लक्ष्मणराव आडावळे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande