नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर मार्गेच प्रस्तावित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)।नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर मार्गेच प्रस्तावित करण्यात यावा, या ठाम मागणीसाठी रेल्वे कृती समिती, सिन्नर यांच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध साम
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर मार्गेच प्रस्तावित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन


नाशिक, 18 जानेवारी (हिं.स.)।नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेर मार्गेच प्रस्तावित करण्यात यावा, या ठाम मागणीसाठी रेल्वे कृती समिती, सिन्नर यांच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास विविध सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक तसेच राजकीय संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सिन्नर-संगमनेर परिसरातून रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी सातत्याने लढा सुरू आहे.

मात्र अलीकडे प्रस्तावित रेल्वे मार्गात बदल करून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव व चाकण परिसराला वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आंदोलनकत्यांनी केला. एकदा रेल्वे मार्ग एखाद्या भागाला वगळून गेला, तर तो पुन्हा त्या भागात येत नाही, हे वास्तव असून या निर्णयामुळे संपूर्ण परिसराच्या विकासावर गंभीर परिणाम होणार असल्याची तीव्र भावना

आंदोलकांनी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांच्या भावना व मागण्या शासनदरबारी ठोसपणे मांडण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी 'रेल्वे आमच्या हक्काची आहे, कोण म्हणतो देणार नाही', 'रेल्वे कृती समितीचा विजय असो', अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार माणिक गाडे यांच्याकडे सादर करण्यात आले. हे आंदोलन कोणत्याही एका व्यक्ती किंवा संस्थेसाठी नसून, सिन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व भावी पिढ्यांच्या हितासाठी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. आंदोलनासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थितांनी तत्काळ रोख स्वरूपात मदत जमा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande