किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात
किश्तवाड, १९ जानेवारी (हिं.स.) किश्तवार जिल्ह्याच्या वरच्या भागात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेण्यासाठी सोमवारी लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. रविवारी चतरू सेक्टरमधील मंद्राल-सिंहपोरा जवळील सोनार गावात ही कारवाई सुरू करण्यात आली होत
किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात


किश्तवाड, १९ जानेवारी (हिं.स.) किश्तवार जिल्ह्याच्या वरच्या भागात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेण्यासाठी सोमवारी लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. रविवारी चतरू सेक्टरमधील मंद्राल-सिंहपोरा जवळील सोनार गावात ही कारवाई सुरू करण्यात आली होती. पण कठीण भूभाग आणि कमी दृश्यमानतेमुळे रविवारी रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली होती.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या चकमकीत गोळीबार झाला, ज्यामध्ये दहशतवाद्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे आठ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आज सूर्योदयाच्या वेळी, लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकांनी पुन्हा कारवाई सुरू केली आणि घेराबंदी कडक केली. घनदाट जंगली भागात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचा वापर केला जात आहे, तर ऑपरेशन क्षेत्रावर हवाई देखरेख ठेवण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर उड्डाण करत आहेत.

गुप्तचर अहवालांवरून असे दिसून येते की, पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (जेईएम) शी संबंधित असल्याचा संशय असलेले दोन ते तीन दहशतवादी या भागात लपले आहेत. रविवारी झालेल्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांशी कोणताही नवीन संपर्क झालेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, कारवाई सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande