द. आफ्रिका: स्कूल बस- ट्रकची धडक होऊन अपघात; १३ मुलांचा मृत्यू
प्रिटोरिया, 19 जानेवारी (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतात सोमवार सकाळी शाळेत जात असलेल्या मुलांनी भरलेल्या मिनीबस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला.या अपघातात कमीतकमी 13 मुलांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सुमारे सात वाजता घडला. य
द. आफ्रिका: स्कूल बस- ट्रकची धडक होऊन अपघात; १३ मुलांचा मृत्यू


प्रिटोरिया, 19 जानेवारी (हिं.स.)।दक्षिण आफ्रिकेच्या गौतेंग प्रांतात सोमवार सकाळी शाळेत जात असलेल्या मुलांनी भरलेल्या मिनीबस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला.या अपघातात कमीतकमी 13 मुलांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सुमारे सात वाजता घडला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अनेक कुटुंबे गंभीर धक्क्यात आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हि खाजगी मिनीबस मुलांना विविध प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सोडायला जात होती, त्यावेळी ती ट्रकच्या समोर धडकली आणि अपघात घडला. या अपघातात 11 मुलांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी दोन मुलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, मिनीबस काही थांबलेल्या वाहनांना ओव्हरटेक करत होती. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकला मिनीबसची थेट धडक झाली.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीची मदत सेवा घटनास्थळी पोहोचली. बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात दाखल केले गेले. पाच जखमींना सेबोकेंग रुग्णालयात आणि दोन जखमींना कोपनॉन्ग रुग्णालयात दाखल केले गेले. बस चालक देखील अपघातात जखमी झाला असून त्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून ट्रक चालकाकडून चौकशी केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने पालक पोहोचले, प्रशासनाने पालकांना धीर देण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काउन्सलिंग टीम तैनात केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अपघातावर गंभीर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, मुलं ही देशाची सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी रस्ता नियम आणि शाळेतील वाहतुकीच्या दर्जावर कठोर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. शिक्षणमंत्र्यांनीही सांगितले की, शाळा वाहतुकीशी संबंधित अनेक अपघात चालकांच्या निष्काळजीमुळे होतात आणि अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करणे गरजेचे आहे. हा अपघात पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षित शाळा प्रवासाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande