लेहमध्ये 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
लेह, 19 जानेवारी (हिं.स.)।लडाखमधील लेह परिसरात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी नोंदण्यात आली आहे. या भूकंपानंतर सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. स्थानिक प्रशा
Earthquake measuring 5.7 in Leh


लेह, 19 जानेवारी (हिं.स.)।लडाखमधील लेह परिसरात सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.7 इतकी नोंदण्यात आली आहे. या भूकंपानंतर सध्या कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) यांच्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी 11 वाजून 51 मिनिटे 14 सेकंद (IST) नोंदवण्यात आला. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 171 किलोमीटर खोलवर होते. एनसीएसनुसार, भूकंपाचे केंद्र 36.71 अंश उत्तर अक्षांश आणि 74.32 अंश पूर्व रेखांशावर होते, जे लेह, लडाख या भागात येते. लडाखमध्ये हा भूकंप अशा वेळी नोंदवण्यात आला आहे की, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील शेजारील भागांमध्येही अलीकडच्या काळात भूकंपीय हालचाली दिसून आल्या आहेत.

सोमवारी सकाळी दिल्लीमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.8 इतकी नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र उत्तर दिल्लीमध्ये होते. हा भूकंप सोमवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी (IST) नोंदवण्यात आला. भूकंपाचे केंद्र जमिनीच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ होते आणि त्याची खोली केवळ 5 किलोमीटर इतकी होती.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र उत्तर दिल्लीमध्येच होते. मात्र धक्के अत्यंत सौम्य असल्याने नागरिकांमध्ये कोणतीही घबराट निर्माण झाली नाही. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीची नोंद नाही. भूकंपानंतर दिल्ली-एनसीआरमधील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. तज्ज्ञांच्या मते, दिल्ली हा भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील भाग असून तो उच्च धोका असलेल्या सिस्मिक झोन-4 मध्ये मोडतो. मात्र 2.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे सामान्यतः कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नसते, असे भूकंपतज्ज्ञ सांगतात.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी अफगाणिस्तानात 4.0 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. एनसीएसनुसार, हा भूकंप 18 जानेवारी रोजी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी (IST) जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर झाला. याआधीच रविवारी सकाळी, 18 जानेवारी रोजीच अफगाणिस्तानात 4.1 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला होता, जो सकाळी 7 वाजून 5 मिनिटे 58 सेकंद (IST) नोंदवण्यात आला होता आणि त्याची खोलीही 10 किलोमीटर होती. तसेच, 15 जानेवारी रोजी अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याची खोली सुमारे 96 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande