कर्तव्य पथावरील संचलन पाहण्यासाठी सुमारे 10 हजार विशेष पाहुण्यांना आमंत्रण
नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.)। येत्या 26 जानेवारी रोजी नवी दिल्ली इथे कर्तव्य पथावर होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पाहुण्यांमध्ये उत्प
Kartavya Path


नवी दिल्ली, 19 जानेवारी (हिं.स.)। येत्या 26 जानेवारी रोजी नवी दिल्ली इथे कर्तव्य पथावर होणाऱ्या 77व्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रांतील सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पाहुण्यांमध्ये उत्पन्न व रोजगार निर्मितीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, सर्वोत्तम नवोन्मेषक, संशोधक व स्टार्ट-अप्स, बचत गट तसेच प्रमुख सरकारी उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे लाभार्थी यांचा समावेश आहे. राष्ट्र बांधणीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

विशेष पाहुण्यांची यादी खाली दिली आहे –

कृषी आणि ग्रामीण विकास

नैसर्गिक शेती करणारे शेतकरी; ‘डाळी आत्मनिर्भरता अभियान’ अंतर्गत डाळी, तेलबिया व मका पिकवण्यासाठी अनुदान मिळवणारे उत्कृष्ट शेतकरी; कृषी बाजार पायाभूत सुविधा निधीअंतर्गत लाभ मिळवणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ); प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत पक्की घरे मिळालेल्या ग्रामीण नागरिक; प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे झालेल्या पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळालेल्या शेतकरी; उसर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी प्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स).

महिला सक्षमीकरण, सामाजिक कल्याण आणि स्वयं-सहायता गट (SHG)

प्रधान मंत्री स्माईल (उपजीविका व उद्यमासाठी वंचित व्यक्तींना सहाय्य) योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात आलेले तृतीयपंथी आणि भिक्षेकरी; प्रधान मंत्री धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय किंवा सेंद्रिय शेतीसाठी प्रशिक्षण, कर्ज व बाजार जोड मिळालेल्या महिला उत्पादक गट; प्रधानमंत्री जनऔषधी परियोजना अंतर्गत जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी विशेष प्रोत्साहन मिळालेल्या महिला उद्योजिका, दिव्यांग, अनुसूचित जाती-जमाती व माजी सैनिक; प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळालेल्या महिला उद्योजिका; राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन (NRLM) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘लखपती दीदी’ स्वयं-सहायता गटातील महिला;

‘सीड’ योजनेतील स्वयं-सहायता गट उपजीविका घटकांतर्गत लाभार्थी महिला.

क्रीडा आणि शिक्षण

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिम्पियाड (IOAA, Jr) 2025 मधील पदक विजेते; विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते; जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे विजेते; ‘मन की बात’ कार्यक्रमातील सहभागी; ‘वीर गाथा’ स्पर्धेचे विजेते; प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेतील उत्कृष्ट कामगिरी करणारे इंटर्न्स; अटल नवप्रवर्तन अभियानांतर्गत अटल टिंकरिंग लॅब्समध्ये प्रशिक्षित उत्कृष्ट विद्यार्थी.

विज्ञान आणि तंत्रज्ञान

गगनयान, चांद्रयान यांसारख्या अलीकडील इस्रो मोहिमांमध्ये सहभागी उत्कृष्ट शास्त्रज्ञ/तांत्रिक कर्मचारी; वैद्यकीय, औद्योगिक व कृषी उपयोगांसाठी समस्थानिक (Isotope) उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधक/नवप्रवर्तक; डीप ओशन मिशन अंतर्गत संशोधक/शास्त्रज्ञ; अटल नवप्रवर्तन अभियानांतर्गत अटल टिंकरिंग लॅब्समध्ये प्रशिक्षित उत्कृष्ट विद्यार्थी; डीआरडीओमधील प्रमुख प्रकल्पांवर कार्य करणारे उत्कृष्ट शास्त्रज्ञ/तांत्रिक कर्मचारी; Bio E3 धोरणांतर्गत उत्कृष्ट जैवतंत्रज्ञान स्टार्टअप्स/उद्योजक; अंतराळ, वैद्यकीय व नवोन्मेष क्षेत्रातील उत्कृष्ट स्टार्टअप्स; सेमीकॉन इंडिया अंतर्गत स्टार्टअप्स व एमएसएमई; बौद्धिक संपदा हक्क आयपी धारक.

कला आणि संस्कृती

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA) योजनेचे लाभार्थी; खादी विकास योजना अंतर्गत प्रशिक्षित उत्कृष्ट कारागीर; प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षित उत्कृष्ट कारागीर व हस्तकला व्यावसायिक.

या विशेष पाहुण्यांना कर्तव्य पथावर प्रमुख स्थानी बसवले जाईल. समारंभांव्यतिरिक्त, या विशेष पाहुण्यांना राष्ट्रीय युद्ध स्मारक, पंतप्रधान संग्रहालय आणि दिल्लीतील इतर प्रमुख ठिकाणी भेट देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना संबंधित मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधीही मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande