
पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकल स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस असणार आहे. त्यामध्ये १६४ सायकलपटू हे सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून ४३७ किलोमीटरचा प्रवास करत विजेतेपदाची वाट शोधणार आहेत. भारताचे प्रतिनिधित्व भारताचा राष्ट्रीय संघ करणार असून, त्यामध्ये हरियानाचा साहिल कुमार व दिनेश कुमार, महाराष्ट्राचा सूर्य थाथू, पंजाबचा विश्वजीत सिंग व हर्षवीरसिंग सिखों आणि कर्नाटकचा एम. नवीनजॉन यांचा समावेश आहे. भारताचा ‘इंडियन डेव्हलपमेंट टीम’ हा संघ देखील स्पर्धेत उतरत आहे.
युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनलच्या (यूसीआय) जागतिक क्रमवारीतील ‘बुर्गोस बर्पेलेट बीएच’ (स्पेन), ‘ली निंग स्टार’ (चीन), ‘तेरेन्गानू सायकलिंग टीम’ (मलेशिया), ‘रोजाई इन्शुरन्स विनस्पेस’, ‘क्विक प्रो टीम’ (एस्टोनिया), ‘टार्टेलेटो-इसोरेक्स’ (बेल्जियम) आदी आंतरराष्ट्रीय संघ स्पर्धेत उतरले आहेत. मोरोक्कोच्या ‘सिदी अली अनलॉक्स स्पोर्टस् टीम’ने माघार घेतल्यामुळे स्पर्धेत २८ संघ असतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु