
बीड, 19 जानेवारी (हिं.स.)। बीड जीएसटी विभागातील राज्य कर अधिकारी सचिन जाधवर (वय ३५) यांचा मृतदेह कपिलधार रोडवर एका कारमध्ये आढळून आला. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून त्यांनी कारमध्ये कोळसा पेटवून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.
जाधवर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वेगवेगळे संशय व्यक्त केले जात होते विशेष म्हणजे त्यांचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचेही चर्चिले गेले. पोलिसांनी या घटनेचा तपास लगेच सुरू केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा पोलीस तपास करण्यात येत आहे
जाधवर यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून, त्या आधारे पोलिसांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती मिळाली आहे.
जाधवर हे मूळचे बार्शी येथील रहिवासी असून ते एक नामांकित लेखक आणि मार्गदर्शक देखील होते. त्यांच्या जाण्याने स्पर्धा परीक्षा विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis