मध्यपूर्व शांतता उपक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
नवी दिल्ली , 19 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष पत्र लिहिले आहे. या पत्रात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना मध्यपूर्वेत शांतता अधिक मजबूत करण्यासाठी आणि जागतिक संघर्
मध्यपूर्व शांतता उपक्रमासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण


नवी दिल्ली , 19 जानेवारी (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष पत्र लिहिले आहे. या पत्रात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना मध्यपूर्वेत शांतता अधिक मजबूत करण्यासाठी आणि जागतिक संघर्ष सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या, ऐतिहासिक आणि भव्य उपक्रमात सहभागी होण्याचे औपचारिक निमंत्रण दिले आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा गौरव केला आहे. ट्रम्प म्हणाले की, मध्य पूर्वेतील देशात शांतता बळकट करण्यासाठी आणि जागतिक संघर्ष सोडवण्यासाठी एक धाडसी नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याच्या या ऐतिहासिक आणि भव्य प्रयत्नात सहभागी होण्यासाठी, भारताचे पंतप्रधान म्हणून तुम्हाला आमंत्रित करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रम्प यांनी गाझा संघर्ष समाप्त करण्यासाठी एका 'व्यापक योजना २०२५' ची घोषणा केली. या योजनेत २० महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या योजनेला अरब जगत, इस्रायल आणि युरोपमधील प्रमुख नेत्यांनी त्वरित मान्यता दिली. १७ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ठराव २८०३ स्वीकारून या उपक्रमाचे समर्थन केले. या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी पीस बोर्ड असेल. ट्रम्प यांच्या मते, ही आतापर्यंतची सर्वात प्रभावी बोर्ड असेल. हे बोर्ड एक नवीन आंतरराष्ट्रीय संघटना आणि संक्रमणकालीन प्रशासन म्हणून काम करेल, ज्याचा मुख्य उद्देश संघर्षाच्या ठिकाणी शांतता आणि सुव्यवस्था राखणे हा असेल.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, हे प्रयत्न जगात शांतता निर्माण करण्यासाठी 'प्रतिष्ठित राष्ट्रांच्या गटाला' एकत्र आणतील. भारत हा जगातील एक अत्यंत आदरणीय आणि शक्तिशाली देश असल्याने, या प्रक्रियेत भारताचा सहभाग निर्णायक ठरणार आहे. तसेच या योजनेमुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध भविष्य सुनिश्चित करता येईल, असेही ट्रम्प यांनी पत्रात म्हटले आहे. या निमंत्रणामुळे भारत आता मध्य पूर्वेतील तणाव मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी या निमंत्रणाला कसा प्रतिसाद देतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande