पुण्यात संस्कृत भारतीतर्फे दहा संस्कृत पुस्तकांचे गुरुवारी लोकार्पण
पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)संस्कृत भारतीतर्फे विविध विषयावरील दहा संस्कृत पुस्तकांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचे माजी कुलपती व आंतरराष्ट्रीय संस्कृत अध्ययन संघाचे अध्यक्ष प्रा.वेंपटी कुट
पुण्यात संस्कृत भारतीतर्फे दहा संस्कृत पुस्तकांचे गुरुवारी लोकार्पण


पुणे, 19 जानेवारी (हिं.स.)संस्कृत भारतीतर्फे विविध विषयावरील दहा संस्कृत पुस्तकांचा लोकार्पण सोहळा गुरुवारी २२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थानाचे माजी कुलपती व आंतरराष्ट्रीय संस्कृत अध्ययन संघाचे अध्यक्ष प्रा.वेंपटी कुटुंबशास्त्री तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश उपाख्य भय्याजी जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत. टिळक रोडवरील गणेश सभागृह येथे सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि सामान्य जनतेपर्यंत संस्कृत सहजपणे पोहोचावे या उद्देशाने संस्कृत भारती ही अखिल भारतीय संस्था कार्य करते. १९८१ पासून ‘सरल संस्कृत’ या संकल्पनेतून संस्कृत संभाषण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने संस्कृत भारती कार्यरत आहे. पुणे आणि परिसरातही संस्कृत भारतीचे शैक्षणिक, प्रशिक्षणात्मक व साहित्यनिर्मितीचे कार्य दीर्घकाळापासून सुरू आहे. सोप्या आणि व्यवहार्य संस्कृतमधून अधिकाधिक नागरिकांना संस्कृतशी जोडावे, यासाठी संस्था उपयुक्त पुस्तके प्रकाशित करते.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या लोकार्पण सोहळ्यात संस्कृत भाषा, साहित्य, संस्कृती, भाषाविज्ञान, नाट्यशास्त्र, सुभाषिते तसेच दैनंदिन जीवनातील संस्कृतच्या उपयोगावर आधारित विविध विषयांवरील १० पुस्तके प्रकाशित होणार आहेत. वन्दना चन्दनग्रामात् - प्रा. गोपबन्धुमिश्र,वर्तमानसन्दर्भे हिन्दुत्वस्य प्रस्तुतिः- जयप्रकाश गौतम, ध्वनिः आणि प्रभुचित्तम् - डॉ. विश्वास, उद्गाराः- वैखरी कुलकर्णी, रञ्जना फडणीस,अस्माकं गृहम् - महाबलभट्ट, मनीषा दलाल,भरतमुनेः नाट्यशास्त्रम् - मेघना वैद्य,कौटिलीयम् अर्थशास्त्रम् डॉ. मंगला मिरासदार आणि विविध लेखकांच्या योगदानातून ग्रन्थरत्नरश्मिः, भाषाविश्लेषणरश्मिः या दहा पुस्तकांचे यावेळी लोकार्पण होणार आहे. ही सर्व पुस्तके अनुभवी लेखक, संशोधक व अभ्यासकांनी लिहिलेली आहेत. नवशिक्या वाचकांपासून ते संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या अभ्यासकांपर्यंत सर्वांसाठी ती उपयुक्त आहेत.नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्कृत भारतीतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande