बीड : ’ऑपरेशन न्यू इयर’ अंतर्गत पोलिसांचे १03 ठिकाणी छापे; 300 वाहनांवर कारवाई
बीड, 2 जानेवारी, (हिं.स.)। बीड जिल्ह्यात ऑपरेशन न्यू इयर ‌ अंतर्गत पोलिसांनी १03 छापे टाकले त 300 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे ''ऑपरेशन न्यू इयर'' या विशेष मोहिमेमुळे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोहिमेत दारु विक्री विरो
बीड : ’ऑपरेशन न्यू इयर’ अंतर्गत पोलिसांचे १03 ठिकाणी छापे; 300 वाहनांवर कारवाई


बीड, 2 जानेवारी, (हिं.स.)। बीड जिल्ह्यात ऑपरेशन न्यू इयर ‌ अंतर्गत पोलिसांनी १03 छापे टाकले त 300 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे

'ऑपरेशन न्यू इयर' या विशेष मोहिमेमुळे बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोहिमेत दारु विक्री विरोधात १०३ छापे टाकले गेले. नियम मोडणाऱ्या ३०० वाहन धारकांवर कारवाई केली गेली तर दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या ३२ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला .

ऑपरेशन न्यू ईअर या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांसह महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, नववर्ष साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू न देणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखणे हा होता. त्यानुसार बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी नाकाबंदी, सतत पेट्रोलिंग आणि विशेष तपास मोहिमा राबविण्यात आल्या. दारू पिऊन वाहन चालवणारे, अवैध दारू विक्रेते, विना हेल्मेट वाहन चालवणारे, ट्रिपल सिट, तसेच विना सीट बेल्ट वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.

' १०३ ठिकाणी छापे टाकून सुमारे ९ लाख २६ हजार७२५ रुपये किमतीचा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे ५ लाख ३२ हजार ५९४ रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. याच कालावधीत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या ३२ वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे ३०० वाहनचालकांवर कारवाई करून २ लाख ८४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande