ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत प्रभावी कारवाई सुरू
आरोपीकडून स्कुटी जप्त
ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत प्रभावी कारवाई सुरू


नांदेड, 02 जानेवारी (हिं.स.)।

नांदेड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा चालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लश आऊट' अंतर्गत प्रभावी कारवाई सुरू असून, या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळवले आहे. जिल्ह्यातील मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांना विशेष सूचना देण्यात आल्या होत्या.

पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास करत पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मळाली की हातोडा चौक परिसरात एक संशयित इसम चोरीची ऑरेंज रंगाची स्कुटी घेऊन थांबलेला आहे. पथकाने तत्काळ कारवाई करून सदर इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडील स्कुटीवर पुढील व मागील बाजूस क्रमांक नसल्याने तसेच वाहनाचे वैध कागदपत्र सादर न करता आल्याने त्याच्याबाबत संशय अधिक बळावला.

सखोल चौकशीत आरोपीने कबुली दिली की, सप्टेंबर महिन्यात तो आपल्या इतर चार साथीदारांसह बारड येथील आंबेगाव पाटी परिसरात गेला होता. त्या ठिकाणी एका व्यक्तीस चाकूने मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व स्कुटी जबरीने हिसकावून त्यांनी पलायन केले होते. तपासाअंती सदर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बारड येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande