स्वित्झर्लंड: रिसॉर्ट आगीतील मृतांची संख्या ४७ वर
बर्न , 02 जानेवारी (हिं.स.)।स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट क्राँस-मोंटाना येथे नववर्षाच्या जल्लोषादरम्यान लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या वाढून आता ४७ झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासकर्त्यांच्या मते, ही आग ‘फ्लॅशओव्हर’मुळे
स्वित्झर्लंडमधील बारमध्ये भीषण स्फोट; अनेक जणांचा मृत्यू


बर्न , 02 जानेवारी (हिं.स.)।स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट क्राँस-मोंटाना येथे नववर्षाच्या जल्लोषादरम्यान लागलेल्या भीषण आगीत मृतांची संख्या वाढून आता ४७ झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तपासकर्त्यांच्या मते, ही आग ‘फ्लॅशओव्हर’मुळे लागली असण्याची शक्यता असून त्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्हाले कॅन्टनमधील अल्पाइन रिसॉर्टमध्ये असलेल्या ‘ले कॉन्स्टेलेशन’ या बारमध्ये नववर्षाच्या उत्सवाच्या वेळी ही आग लागली. आग इतक्या झपाट्याने पसरली की बारमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. त्या वेळी बारमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.व्हाले कॅन्टनच्या अॅटर्नी जनरल बेआत्रिस पिलू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘फ्लॅशओव्हर’मुळे स्फोट होऊन आग लागली का, याचा तपास तपास यंत्रणा करत आहेत. अनेक परिस्थितींचा अभ्यास केला जात असून विविध शक्यतांचा विचार केला जात आहे. अनेक प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवण्यात आली आहे आणि घटनास्थळावरून सापडलेल्या मोबाईल फोनची तपासणी सुरू आहे. घटनांचा नेमका क्रम अजून स्पष्ट झालेला नसून तपास सुरू असल्याचे पिलू यांनी सांगितले.

स्विस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, या घटनेकडे दहशतवादी हल्ला म्हणून पाहिले जात नाही. आग लागल्यानंतर संपूर्ण रात्र आपत्कालीन सेवा कार्यरत होत्या. जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि परिसर सुरक्षित करण्यासाठी अनेक रुग्णवाहिका आणि बचाव हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. सध्या मृतांची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही. फॉरेन्सिक पथके घटनास्थळी तपास करत आहेत.अमेरिकेच्या नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशननुसार, बंद जागेत गरम वायू छतापर्यंत पोहोचून साचतात आणि तापमान अचानक प्रचंड वाढते. त्यामुळे त्या जागेतील सर्व ज्वलनशील वस्तू एकाच वेळी पेट घेतात, या प्रक्रियेला ‘फ्लॅशओव्हर’ असे म्हणतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande