
मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.)। इनफिनिक्सने आपला नवीन मिड-रेंज स्मार्टफोन ‘इनफिनिक्स नोट एज’ लाँच केला असून, तो स्लिम डिझाइन, मोठा कर्व्ड AMOLED डिस्प्ले, दमदार बॅटरी आणि 5G सपोर्टसह बाजारात दाखल झाला आहे. बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम लुक आणि आकर्षक वैशिष्ट्ये देणारा हा फोन ग्राहकांसाठी एक स्पर्धात्मक पर्याय ठरत आहे.
इनफिनिक्स नोट एजची किंमत सुमारे 200 डॉलर म्हणजेच अंदाजे 18,200 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ल्यूनर टायटॅनियम, स्टेलर ब्ल्यू, शॅडो ब्लॅक आणि सिल्क ग्रीन अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. प्रीमियम डिझाइन असूनही किफायतशीर किमतीमुळे हा फोन लवकरच ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्याची शक्यता आहे.
या फोनमध्ये 6.78 इंचाची 1.5K रिझोल्यूशन असलेली कर्व्ड AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2,800Hz इन्स्टंट टच रिस्पॉन्समुळे स्क्रीन अतिशय स्मूथ अनुभव देते. 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, 4,500 निट्स पीक ब्राइटनेस, 2160Hz PWM डिमिंग आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शनमुळे डिस्प्ले अधिक मजबूत आणि आकर्षक ठरतो. फोनची जाडी केवळ 7.2 मिमी असून वजन 185 ते 190 ग्रॅम आहे. IP65 डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट रेटिंगमुळे दैनंदिन वापरात सुरक्षितताही मिळते.
परफॉर्मन्सच्या दृष्टीने इनफिनिक्स नोट एजमध्ये 6nm मीडिया टेक डायमेंसिटी 7100 चिपसेट, माली-G610 GPU, 8GB LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित XOS 16 वर चालतो. कंपनीने 3 वर्षांचे OS अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देण्याचे आश्वासन दिले आहे. XOS 16 मध्ये लेयर्ड इंटरफेस, सेमी-ट्रान्सपेरंट एलिमेंट्स, अॅडॅप्टिव्ह अॅनिमेशन्स तसेच AI आधारित कॅमेरा सीन रेकग्निशन, AI पोट्रेट आणि iPhone सह NFC द्वारे नेटवर्कशिवाय लाइव्ह फोटो ट्रान्सफर यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
कॅमेराच्या बाबतीत या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा आणि ड्युअल फ्लॅश देण्यात आला आहे. पोर्ट्रेट, नाइट, स्लो मोशन, टाइम-लॅप्स, पॅनोरामा, डॉक्युमेंट स्कॅन आणि AI मोड्ससारखे विविध फिचर्स उपलब्ध आहेत. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असून, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी 2K@30fps आणि 720p@120fps स्लो-मोशन सपोर्ट आहे.
बॅटरीच्या बाबतीत इनफिनिक्स नोट एजमध्ये 6,500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, ती 45W फास्ट चार्जिंग, 10W रिव्हर्स वायर्ड चार्जिंग आणि बायपास चार्जिंग मोड सपोर्ट करते, ज्यामुळे गेमिंगदरम्यान उष्णता कमी राहते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5.5G/5G, Wi-Fi, ब्ल्यूटूथ 5.4, NFC, GPS, FM रेडिओ, IR ब्लास्टर आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे. JBL ट्यून ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि Hi-Res ऑडिओ सपोर्टमुळे ऑडिओ अनुभवही उत्कृष्ट मिळतो. सिक्युरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
एकूणच इनफिनिक्स नोट एज हा बजेट सेगमेंटमध्ये प्रीमियम फील देणारा, आधुनिक डिझाइन आणि दमदार फीचर्ससह परिपूर्ण पर्याय म्हणून ग्राहकांसमोर आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule