शेअर बाजारात सुरुवातीला विक्रीवर दबाव; सेन्सेक्स-निफ्टी घसरले
नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिल्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक दबावाचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारावरही दिसून आल
stock market


नवी दिल्ली, 20 जानेवारी (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी दिल्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक दबावाचा परिणाम आज देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारावरही दिसून आला. आज व्यवहाराची सुरुवात किरकोळ घसरणीसह झाली होती. बाजार उघडताच खरेदीच्या आधारावर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांत थोडी तेजी दिसली, मात्र काही वेळातच चौफेर विक्री सुरू झाली. सातत्याने होत असलेल्या विक्रीमुळे दोन्ही निर्देशांकांची कमजोरी वाढत गेली. पहिल्या एका तासाच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ०.४० टक्के आणि निफ्टी ०.४६ टक्के घसरणीसह व्यवहार करत होते.

सुरुवातीच्या एका तासाच्या व्यवहारानंतर बाजारातील आघाडीच्या शेअर्सपैकी एनटीपीसी, एसबीआय, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोटक महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स १.१८ टक्क्यांपासून ०.४७ टक्क्यांपर्यंत वाढीसह व्यवहार करत होते. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, एटरनल, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व आणि ट्रेंट लिमिटेड हे शेअर्स २.५० टक्क्यांपासून १.६७ टक्क्यांपर्यंत घसरणीसह व्यवहार करताना दिसत होते.

आतापर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारात एकूण २,६५२ शेअर्समध्ये सक्रिय व्यवहार होत होते. त्यापैकी ५३३ शेअर्स नफ्यासह हिरव्या चिन्हात व्यवहार करत होते, तर २,११९ शेअर्स तोट्यात लाल चिन्हात व्यवहार करत होते. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी ७ शेअर्स खरेदीच्या आधारावर हिरव्या चिन्हात होते, तर २३ शेअर्स विक्रीच्या दबावाखाली लाल चिन्हात व्यवहार करत होते. निफ्टीतील ५० शेअर्सपैकी ६ शेअर्स हिरव्या चिन्हात आणि ४४ शेअर्स लाल चिन्हात व्यवहार करताना दिसत होते.

बीएसईचा सेन्सेक्स आज ३८.८० अंकांच्या किरकोळ घसरणीसह ८३,२०७.३८ अंकांवर खुला झाला. व्यवहाराच्या सुरुवातीलाच खरेदीच्या आधारावर अवघ्या दोन मिनिटांत तो वाढून ८३,२५४.२८ अंकांपर्यंत पोहोचला. मात्र त्यानंतर बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाल्यामुळे सेन्सेक्स पुन्हा लाल चिन्हात घसरला. सातत्याने होत असलेल्या विक्रीमुळे हा निर्देशांक घसरत ८२,८१२.३२ अंकांपर्यंत आला. त्यानंतर झालेल्या किरकोळ खरेदीमुळे त्याच्या स्थितीत थोडी सुधारणा झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान पहिल्या एका तासाच्या व्यवहारानंतर सकाळी १०:१५ वाजता सेन्सेक्स ३३३.६५ अंक घसरून ८२,९१२.५३ अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्सप्रमाणेच एनएसईचा निफ्टी आज फक्त ५.२० अंकांनी घसरत २५,५८०.३० अंकांवर खुला झाला. बाजार उघडल्यानंतर थोड्याच वेळात चौफेर विक्री सुरू झाल्यामुळे या निर्देशांकाची कमजोरी वाढू लागली. सातत्याने होत असलेल्या विक्रीमुळे सकाळी १० वाजण्याच्या आधी निफ्टी १५० अंकांहून अधिक घसरून २५,४३२.६० अंकांपर्यंत आला. त्यानंतर खरेदीदारांनी बाजारात जोर लावल्यामुळे या निर्देशांकाच्या स्थितीत सुधारणा झाली. बाजारात सुरू असलेल्या खरेदी-विक्रीदरम्यान पहिल्या एका तासाच्या व्यवहारानंतर सकाळी १०:१५ वाजता निफ्टी ११८ अंकांच्या घसरणीसह २५,४६७.५० अंकांवर व्यवहार करत होता.

याआधी मागील कारोबारी दिवशी, सोमवारी सेन्सेक्स ३२४.१७ अंक म्हणजेच ०.३९ टक्के घसरून ८३,२४६.१८ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टीने १०८.८५ अंक म्हणजेच ०.४२ टक्के घसरणीसह २५,५८५.५० अंकांवर सोमवारचा व्यवहार संपवला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande